नाशिकला मुख्यमंत्र्यांचा रोड शो व पंतप्रधानांची सभा

ब्युरो रिपोर्ट : ज्योती सोनवणे

नाशिक (१६ सप्टेंबर) : भारतााचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांची गुरवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी जाहीर सभा दुपारी १२ वाजता, अटल मैदान साधुग्राम, तपोवन, नाशिक येेेथे होणार आहे, तसेच माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपानिमित्त बुधवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी यात्रेचे नाशकात आगमन होणार आहे. महाजनादेश यात्रे बरोबर मुख्यमंत्र्यांचा रोड शो देखील होणार आहे यात्रेत कार्यकर्ते व दुचाकी स्वार बहुसंख्येने सहभागी होणार आहेत तसेच चौकाचौकात रांगोळ्या काढण्यात येणार आहेत महाजनादेश यात्रेचा मार्ग पाथर्डी फाटा ते तपोवन असा रहाणार आहे नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि नाशिक पुर्व या तिन्ही मतदार संघातुन यात्रा जाणार आहे यात्रेला बुधवार दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता सुरवात होऊन रात्रो ८.०० वाजता समारोप होणार आहे, संघजन प्रतिष्ठान च्या सर्व सदस्यांना आवाहन करण्यात येत आहे कि आपण आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीजींची सभा व माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत बहुसंख्येने सहभागी व्हावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी संघजन प्रतिष्ठान च्या सर्व सदस्यांच्या वतीने महाजनादेश यात्रेचे त्र्यंबक नाका सिग्नल (सरदार विंचुरकर चौक) नाशिक येथे स्वागत करण्यात येणार आहे आपण सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघजन प्रतिष्ठान कडुन करण्यात आले आहे